फाउंडेशन बद्दल:

शांताराम जानोरकार फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स ची स्थापना २०१२ मध्ये मु. आणि पोस्ट. महान, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला (महाराष्ट्र राज्य), भारत येथे झाली. या फाउंडेशनचा मुख्य हेतू स्वर्गीय श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांच्या गणित विषयातील संशोधनाच्या कार्याचा प्रसार करणे व गणित विषयाला लोकप्रिय करण्यासाठी आणि गणित व भौतिकशास्त्रातील समस्या सोडवण्यासाठी चा आहे.


संस्था स्थापने बद्दल माझे दोन शब्द : श्री. धनंजय शांताराम जानोरकार

माझे वडील स्वर्गीय श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांनी संशोधित केलेले गणित - विज्ञान - आध्यात्म मधील वेग वेगळ्या विषया वरील संशोधन खऱ्या अर्थाने प्रस्थापित होण्याकरिता मी १८ वर्षा पासून सर्व स्तरातून वेगवेगळ्या रितीने प्रयत्न करीत असून हे संशोधन खऱ्या अर्थाने प्रस्थापित होण्याकरिता दिनांक. ११ डिसेंबर , २०११ रोजी आदरणीय प्रोफेसर डॉ. टि . एम. करडे (डी . एस्सी., डी. एस्सी., प्रेसिडेंट, आईनस्टाईन फाउंडेशन इंटरनेशनल, माजी कुलगुरू, इंडियन विधापीठ, रायपुर, माजी डीन,फैकल्टी ऑफ सायन्स, नागपूर विद्यापीठ.) यांनी मला, माझ्या स्वर्गीय वडिलांनी तिस (३०) वर्ष अथक परिश्रम घेवून केलेले वेगवेगळ्या विषयावरील गणिता मधील संशोधन निष्फळ जावूनये, ह्या संशोधनाचा, ह्या लॉजिकचा भविष्या मध्ये गणित व सायन्स मध्ये खरा उपयोग व्हायला पाहिजे व ह्या संशोधनावर पुढे संशोधन व्हायला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मला "शांताराम जानोरकार फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स" हि त्यांच्या नावाने संस्था स्थापन करण्याची प्रेरणा त्यांनी दिली व ह्या संस्थेचे उद्देश सुद्धा त्यांनीच सांगितले.

संस्थेचे उद्देश:

 1. स्व. श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांचे गणित संशोधन हे सर्व स्तरावर, पातळीवर प्रसारित करणे.

 2. स्व. श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांनी केलेले मराठी भाषेमधील संपूर्ण वेगवेगळ्या विषयामधील स्वतःहस्तलिखित संशोधनाचे, संशोधनामध्ये कसल्याही प्रकारचा बद्दल न करता टंकलेखन करून सर्व भाषांमध्ये भाषांतर करणे.

 3. स्व. श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांनी केलेल्या संशोधनामध्ये रुची (आवड) असणाऱ्यांना प्रोत्साहित करणे.

 4. स्व. श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांच्या संशोधनाचा प्रसार करणे.

 5. स्व. श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांच्या संशोधनावर संशोधन करणाऱ्यांना प्रोत्साहन व आर्थिक मदत करणे.

 6. स्व. श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांनी केलेल्या संशोधनावर राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय, जागतिकस्तरीय, सेमिनार, कॉन्फरन्स, व्याखान, अभीयान ईत्यादी आयोजित करणे.

 7. "शांताराम जानोरकार फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स" ह्या संस्थेची आर्थिक बाजू सब्बळ करण्यासाठी वेगवेगळ्या स्थानिक, स्वराज्य संस्था, खाजगी व सरकारी संस्थान कडे फंडासाठी अर्ज करणे.

 8. "शांताराम जानोरकार फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स" ह्या फाउंडेशन द्वारा गणितीय संस्था उभारणे, विविध शैक्षणिक संस्था, ईत्यादी उभारणे.

 9. गणिताचा प्रचार करण्यासाठी गणित संशोधन पत्रिका प्रकाशित करणे.

स्व. श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांनी संशोधित केलेले संशोधन,

 1. बिंदू - बिंदूच्या अस्तित्वाची सिद्धता व स्वरूप.
 2. च्या एवजी म्हणजेच शक्ती = वस्तुमान x वस्तुमानाच्या वेगाचा वर्ग, प्रकशाचा वेग = २२,३२,००,००,००० मैल/प्रति सेकंद (बाविस अब्ज बत्तिस कोटी मैल/प्रति सेकंद)

 3. चकाकणारी विज आणि गडगडणारा मेघ यांच्या आवाजामधील अंतर.

 4. गोबाचा स्वयंसिद्ध सिद्धांत व सूत्राच्या आधाराचे स्पष्टीकरण.
  (पाय ची म्हणजेच गोबाची निश्चिंत किंमत = ३.१४१५९२६५३).

 5. वर्तुळाचे चौरसीकरण = ५६०५ x ५६०५ = ३१४१६०२५/१००००००० = ३.१४१६०२५o

 6. ओम - ओम ची वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धता व स्वरूप.

 7. आत्मा - आत्म्याचे अस्तित्वाची सिद्धता, स्वरूप व नामकरण. आणि ईतर अनेक संशोधने आणि (C कॉपीराईट, संपूर्ण संशोधन)

संस्थेचा नोंदणी क्रमांक :


संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अन्वय नोंदणी क्रमांक : महा/२१७/२०१२/अकोला दिनांक : २७/०३/२०१२.
मुंबई सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० अन्वय नोंदणी क्रमांक : एफ-१५७१६ अकोला दिनांक : ३१/०५/२०१२
संस्थेचा पॅन नंबर बद्दल माहिती : पॅन नंबर : ए ए एम टी एस ६९११ क्यू
दिनांक : २७/०३/२०१२

गणित, विज्ञान व अध्यात्म मध्ये भारताची, संपूर्ण जगा मध्ये शान व मान उंचविण्याच्या दृष्टीकोनातून व जगातील सर्व विध्यार्थ्यांना खरे व सत्य ज्ञान व शिक्षण मिळावे या उद्देशाने हि संस्था स्थापन करण्यात आली. कृपा करून शांताराम जानोरकर फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स, (स्थापना - २०१२, रजिस्ट्रेशन नं. महा/२१७/१२, एफ. १५७१६ (अकोला), मु. पो. महान. ४४४४०५, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला (महाराष्ट्र राज्य), भारत , या संस्थेला आर्थिक दृष्ट्या संस्थेच्या प्रगती करीता ऑन लाईन मदत करण्याची कृपा करावी.

संस्थेच्या बँक खात्या बद्दल माहिती:


बँक : भारतीय स्टेट बँक
बँक खाते क्रमांक :३ २ ४ ७ ८ ४ ० ६ ५ ७ ८
शाखा :महान सब, मु. पो. महान, जि. अकोला
शाखा कोड : ७३७०
आय एफ एस सि कोड : एस बी आय एन ०००७३७०
एम आय सि आर कोड : ४४४००२४९८
स्विफ्ट कोड : एस बी आय एन आय एन बी बी ५३३

महान खेड्याविषयी:


महान खेडे अकोल्यापासून ३५ किमी अंतरावर स्थित आहे, हे पद्मश्री मा. विजय भटकर यांचा जन्म झालेल्या मुर्तीजापूर मतदारसंघात आहे. हे काटेपुर्णा प्रकल्पाअंतर्गत एक छान धरण आणि एका जुन्या करुनेश्वर मंदिर (७ वे शतक) असलेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. महानला पोहचण्यासाठी आपणास अकोला रेल्वे स्थानकावर उतरावे लागेल.

अकोला जिल्ह्याबद्दल :


मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागातील अकोला जिल्ह्यातील अकोला एक शहर आहे. ते मुंबई (पूर्वीचे "बॉम्बे") पासून पूर्वेला सुमारे ५८४ किमी आणि नागपूरच्या पश्चिमेला २५० किमी अंतरावर स्थित आहे. अकोला हे अमरावती विभागामधील अकोला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून ते अकोला महापालीकेद्वारे संचालित आहे. आज, अकोला हे विकसनशील आणि विदर्भातील एक प्रमुख शहर आहे. अकोल्यामध्ये खूप चांगला धान्याचा बाजार, तेल गिरण्या, डाळ (डाळी) गिरण्या आहेत आणि ते कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आयटी क्षेत्रात देखील वेगाने वाढ होत आहे. हे शहर शास्त्रीय संगीत, अध्यात्मिक, नाटक, क्रीडा आणि साहित्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ओळखले जाते. अशा कृती आणि संधी यांमुळे प्रदेशातील इतर भागातून स्थलांतरण करणाऱ्या व्यक्ती आणि विध्यार्थी आकर्षित होतात. अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या १८,१८,६१७ आहे (२०११ च्या जनगणनेनुसार). नागपूर आणि अमरावती नंतर अकोला हे विदर्भातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मराठी हि सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे, पण हिंदी, ईंग्रजी आणि उर्दू या भाषेंचा देखील वापर केला जातो. अकोला जिल्ह्याच्या उतरेस आणि पूर्वेस अमरावती जिल्ह्याच्या सीमा, दक्षिणेस वाशिम जिल्ह्याच्या सीमा आणि पक्ष्चीमेस बुलढाणा जिल्ह्याची सीमा येते.