English | हिन्दी | मराठी

          
                                           
International Journal
ISO 9001:2008, ISSN
                                 Books
ISO 9001:2008, ISBN

फाउंडेशन बद्दल:

शांताराम जानोरकार फाउंडेशन ऑफ माॅथमॅटिक्स ची स्थापना २०१२ मध्ये मु. आणि पोस्ट. महान, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला (महाराष्ट्र राज्य), भारत येथे झाली. या फाउंडेशनचा मुख्य हेतू स्वर्गीय श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांच्या गणित विषयातील संशोधनाच्या कार्याचा प्रसार करणे व गणित विषयाला लोकप्रिय करण्यासाठी आणि गणित व भौतिकशास्त्रातील समस्या सोडवण्यासाठी चा आहे.संस्था स्थापने बद्दल माझे दोन शब्द : श्री. धनंजय शांताराम जानोरकार

माझे वडील स्वर्गीय श्री. शांताराम बापुराव जानोरकार यांनी संशोधित केलेले गणित - विज्ञान - आध्यात्म मधील वेग वेगळ्या विषया वरील संशोधन खऱ्या अर्थाने प्रस्थापित होण्याकरिता मी १८ वर्षा पासून सर्व स्तरातून वेगवेगळ्या रितीने प्रयत्न करीत असून हे संशोधन खऱ्या अर्थाने प्रस्थापित होण्याकरिता दिनांक. ११ डिसेंबर , २०११ रोजी आदरणीय प्रोफेसर डॉ. टि . एम. करडे (डी . एस्सी., डी. एस्सी., प्रेसिडेंट, आईनस्टाईन फाउंडेशन इंटरनेशनल, माजी कुलगुरू, इंडियन विधापीठ, रायपुर, माजी डीन,फैकल्टी ऑफ सायन्स, नागपूर विद्यापीठ.) यांनी मला, माझ्या स्वर्गीय वडिलांनी तिस (३०) वर्ष अथक परिश्रम घेवून केलेले वेगवेगळ्या विषयावरील गणिता मधील संशोधन निष्फळ जावूनये, ह्या संशोधनाचा, ह्या लॉजिकचा भविष्या मध्ये गणित व सायन्स मध्ये खरा उपयोग व्हायला पाहिजे व ह्या संशोधनावर पुढे संशोधन व्हायला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मला "शांताराम जानोरकार फाउंडेशन ऑफ माॅथमॅटिक्स " हि त्यांच्या नावाने संस्था स्थापन करण्याची प्रेरणा त्यांनी दिली व ह्या संस्थेचे उद्देश सुद्धा त्यांनीच सांगितले.

Follow Us

देणगी

ऑनलाईन देणगी